कोकाकोला डेअरी उत्पादने बाजारात आणणार


सॉफ्ट ड्रिंक कंपनी अशी बाजारातील ओळख पुसून काढताना कोका कोला कंपनी भारतीय बाजारात डेअरी उत्पादने पुन्हा एकदा सादर करणार आहे. सप्टेंबरमध्ये हि उत्पादने विओ आणि मिनट मेड ब्रांडखाली येत असून विओ हा जुना ब्रांड आहे. कंपनीचे इंडिया आणि प.आशिया विभागाचे अध्यक्ष टी कृष्णकुमार यांनी हि माहिती दिली.

ते म्हणाले विओ चॉकलेट सह अन्य दोन तीन फ्लेवर १८० मिली. च्या टेट्रापॅक मधून सादर करत असून त्यांची किंमत साधारण २५ रु. असेल. हे उत्पादन फ्लेवर्ड मिल्क प्रमाणे आहे. मिनट मेड ब्रांड खाली फ्रुट आणि डेअरी उत्पादने येतील. त्यात मिक्स ज्यूस २५० मिली पॅक मध्ये ३० रुपयात मिळणार आहेत. आम्ही आता हेल्दी ड्रिंक बाजारात येत आहोत आणि ग्राहकांकडून प्रतिसाद मिळण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment