
नवी दिल्ली – विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये ३५.५० पैशांची तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरही महाग झालं असून, १.७६ रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे.
आत्ता बोंबला… घरगुती गॅस सिलेंडर महागला
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ही दरवाढ जीएसटीमुळे करण्यात आल्याचे म्हटले आहे. १.७६ रुपयांनी महाग झाल्याने ४९६.२६ रुपयांवरून घरगुती अनुदानित गॅसची किंमत ४९८.०२ झाली आहे. या नव्या किंमती आज मध्यरात्रीपासून लागू होतील. यापूर्वी १ जुलै रोजी गॅसचे दर २.७१ रुपयांनी वाढवण्यात आले होते. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये बदल केला जातो.
