लेनेवोचा ५ जी स्मार्टफोन सर्वप्रथम येणार?


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवो ५ जी सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन वर काम करण्यात आघाडीवर असून कंपनीचे उपाध्यक्ष चंग चेंग यांनी लेनेवो ५ जी सपोर्ट करणारा स्मार्टफोन सर्वप्रथम बाजारात आणणार आहे असे मायक्रोसाईट वायबो वर पोस्ट केले आहे. अर्थात ओप्पो, हुवाई, वन प्लस या कंपन्याही ५ जी स्मार्टफोन वर गेले काही दिवस काम करत आहेत.

चेंग याच्या म्हणण्यानुसार या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ चीपसेट वापरला जाईल. हि चीप या वर्षअखेरी अथवा २०१९ च्या सुरवातीला लाँच होईल आणि त्यानंतरच स्मार्टफोन चे उत्पादन सुरु केले जाईल. हुवाईने त्याच्या ५ जी स्मार्टफोन २०१९ च्या तिसरया तिमाहीत बाजारात येईल अशी घोषणा पूर्वीच केली आहे तर ओप्पो ने क्वालकॉमच्या भागीदारीत हा फोन पुढच्या वर्षात सादर केला जाणार असल्यचे सूचित केले आहे.

वन प्लसने २०१९ मध्ये त्याच्या फ्लॅगशिप फोन ५ जी सह येईल असे जाहीर केले आहे. तर सॅमसंगचा गॅलेक्सी एस १० हा फोन ५ जी फोन असेल असेही सांगितले जात आहे. ५ जी हे पाचव्या पिढीचे तंत्रज्ञान असून ते अति वेगवान आहे. मोठा डेटा काही क्षणात डाऊनलोड करणे अथवा अपलोड करणे त्यामुळे शक्य होणार आहे आणि हे काम १ जीबीपीएस च्या वेगाने होऊ शकणार आहे. अमेरिका, चीन आणि द. कोरिया येथे हि सेवा जगात सर्वप्रथम सुरु होईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment