आयफोन X पेक्षाही महाग स्मार्टफोन एलजीने केला लॉन्च


आयफोन X पेक्षाही महाग असणारा एक स्मार्टफोन तंत्रज्ञान क्षेत्रातील दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी एलजीने लॉन्च केला आहे. कंपनीच्या सिग्नेचर सिरीजमधील हा स्मार्टफोन असून कंपनीने गेल्याच वर्षी या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता एलजी व्ही ३५ सिग्नेचर एडिशन २०१८ हा फोन कंपनीने लॉन्च केला आहे. जवळपास १ लाख २३ हजार रुपये एवढी या फोनची किंमत आहे, तर जवळपास १ लाख २ हजार रुपये आयफोन X च्या टॉप मॉडेलची किंमत आहे.

Ziroconium ceramic चा वापर एलजी सिग्नेचर एडिशन २०१८ हा फोन बनवताना करण्यात आला असल्यामुळे फोनवर स्क्रॅच पडणार नाहीत असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय कस्टमर फोनच्या मागच्या बाजूला स्वतःचे नाव देखील कोरू शकतात. 6 इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये आहे. कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे प्रोटेक्शनही डिस्प्लेला आहे.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर वर एलजी सिग्नेचर एडिशन २०१८ कार्यरत असेल. फोनमध्ये ६जीबी रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज आहे, मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज तब्बल २ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप स्मार्टफोनमध्ये आहे, १६ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम Quick चार्ज 3.0 आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3,300 mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, VoLTE, 3G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC आणि USB टाइप C हे फिचर आहेत.

Leave a Comment