आता तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळणार ट्रेनचे लाईव्ह स्टेटस


नवी दिल्ली : तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुम्हाला त्या ट्रेनचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर याबाबत आयआरसीटीसीने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. यासाठी भारतीय रेल्वेने मेक माय ट्रिपसोबत भागीदारी केली असल्यामुळे ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तुम्हाला मेसेंजरवरही मिळेल.

तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही समजणार आहे. त्याचबरोबर पुढील स्टेशन कोणते आहे, कोणते स्टेशन येऊन गेले याचीही माहिती मिळेल. तुम्हाला यासाठी आता १३९ क्रमांक डायल करावा लागणार नाही, किंवा इतर कोणते अॅपही घेवे लागणार नाही.

यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे, जेणकेरुन नवीन व्हर्जन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअॅपवर माहिती जाणून घेण्यासाठी मेक माय ट्रिपचा ७३४९३८९१०४ हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. मेक माय ट्रिपचा क्रमांक व्हॉट्सअॅपमधून ओपन करा. ट्रेनचा नंबर त्यामध्ये टाईप करुन मेसेज सेंड करा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवे असलेल्या ट्रेनचे स्टेटस मिळेल. याच पद्धतीने पीएनआर नंबर व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. यामुळे तुम्हाला तुमच्या तिकिटाचे स्टेटसही मिळेल.

Leave a Comment