फ्लिपकार्टवर चक्क एवढ्या किंमतीत मिळत आहे आयफोन ६


गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या इ कॉमर्स संकेतस्थळांवर सेल सुरू असल्यामुळे विविध ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अॅपलचा आयफोन ६ सेलमध्ये अवघ्या ६ हजार ५०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे.

ग्राहकांना या ऑफरचा लाभ फ्लिपकार्टवर घेता येईल. ही ऑफर आयफोन ६ च्या ३२जीबी व्हेरियंटवर असून ग्राहकांना हा फोन ३६६७ रुपये प्रतिमहिना नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचीही ऑफऱ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ७३१ रुपये प्रतिमहिना भरुनही हा फोन खरेदी करता येऊ शकतो. तसेच या फोनवर १५ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून दिली जात आहे. म्हणजे तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घेतल्यास १५ हजार रुपयांची सूट मिळेल. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर कोणत्या फोनवर किती सूट देण्यात आली आहे, याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच कोणाला जर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली तर फोनची किंमत कमी होवून केवळ ६ हजार ९९९ रुपये होईल. याशिवाय तुम्ही एसबीआयच्या कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि अजून ७०० रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला हा फोन केवळ ६ हजार ५०० रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.

Leave a Comment