अशी असेल १०० रुपयांची नवी नोट


मुंबई – लवकरच १०० रुपयांची नवी नोट भारतीय रिझर्व्ह बँक बाजारात आणणार आहे. नुकताच या नव्या नोटेचा फोटो आरबीआयकडून जारी करण्यात आला आहे. हलकासा जांभळा असा या नव्या नोटेचा रंग असून गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र यामध्ये आहे. नवी नोट बाजारात आल्यानंतर जुनी नोटही चलनात राहील. या म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटेच्या डिझाईनला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. २००० रूपयांच्या नव्या नोटांची छपाई याच प्रेसमध्ये होते.

६६ मिमी × १४२ मिमी एवढी या नोटेची साइज असेल. ही नोट आकाराने सध्या अस्तिवात असलेल्या १०० रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि १० रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. ही नोट बाजारात आल्यानंतर छपाईचा वेग वाढवण्यात येईल. ऑगस्ट अखेरपर्यंत ही नवी नोट बाजारात येऊ शकते. होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलच्या स्वदेशी पेपर आणि शाईने ही नोट छापली जाणार आहे. देवास प्रेसच्या व्यवस्थापनाकडून अद्याप नव्या नोटेबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment