
मुंबई : दूरसंचार मंत्रालयाकडून आयडिया आणि व्होडाफोनच्या एकत्रीकरणाला सशर्त मंजुरी मिळाली असून या नव्या कंपनीचे नाव ‘व्होडाफोन – आयडिया लिमिटेड’ असे असणार आहे. यासोबतच देशातील सर्वात मोठी ‘टेलिकॉम ऑपरेटर’ ही कंपनी बनणार आहे.
ही कंपनी बनणार देशातील सर्वात मोठी ‘टेलिकॉम ऑपरेटर’
सूत्रांच्या माहितीनुसार, व्होडाफोनला स्पेक्ट्रमसाठी ‘आयडिया सेल्युलर’ला यासाठी ३,९२६ करोड रुपये देणे अपेक्षित आहे. सोबतच ३३४२ करोड रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याची अटही ठेवण्यात आली आहे. या नव्या कंपनीची बाजारातील भागीदारी ३५ टक्के होईल आणि याच्या ग्राहकांची संख्या जवळपास ४३ कोटी एवढी होईल. पण कंपनीला यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. शेअर होल्डर्सची मंजुरी कंपनीला घ्यावी लागेल तसेच आयडिया सेक्युलरला व्होडाफोनच्या स्पेक्ट्रमसाठी ३ हजार ९२६ कोटी रुपये रोख भरावे लागतील शिवाय ३ हजार ३४२ कोटींची बँक गँरंटी जमा करावी लागणार आहे.
