२ लेकरांची आई पडली १६ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली


लंडन – असे म्हणतात की प्रेम आंधळे असते, पण याबाबतीत ब्रिटनमधील दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेने हद्दच केली. अवघ्या १६ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात ती पडली. एवढेच नाही तर १६ वर्षीय मुलाच्या बाळाची ती आई सुद्धा बनली. त्या वर्षीय ३१ महिलेचे नाव कॅथलीन मार्टिन असे असून याबाबत तिनेच खुलासा केला आहे. फेसबूकवर जॅक (१६) आणि कॅथलीन यांची मैत्री झाली होती. ही मैत्री काही दिवसांतच प्रेमात बदलली.

या प्रेमकहाणीबद्दल कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, तिचा २०१५मध्ये पतीसोबत घटस्फोट झाला होता. आधीपासूनच ती दोन मुलांची आई होती. त्यातील एका मुलाचे वय ११ वर्षे आणि दुसऱ्या मुलाचे वय ३ वर्षे होते. कॅथलीन त्याचवेळी फेसबूकवर १६ वर्षीय मुलगा जॅक कुसाइलच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री आणि रोज चॅटिंगला सुरुवात झाली. त्याच दरम्यान मी तुझ्या घरी येऊन गार्डनिंगमध्ये मदत करू शकतो का? असे जॅकने विचारले. कॅथलीनने वेळीच त्याला होकार देत घरी बोलावले. यानंतर कॅथलीनच्या घरात दोघांच्या भेटी होत गेल्या.

जॅक आणि तिच्यात संबंध प्रस्थापित होऊन ५ महिने उलटले होते. जॅकच्या आईला यानंतरच याबद्दल कळाले. जॅक आणि कॅथलीन या दोघांवरही ती नाराज झाली. जॅकला आईने वारंवार समजावून सांगितले. आपल्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या महिलेशी संबंध ठेवू नये म्हणत त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आईला हे जेव्हा कळाले की कॅथलीन जॅकच्या मुलाची आई होणार तेव्हा तिने या दोघांचे रिलेशन मान्य केले. कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, यानंतर जॅकची आई स्वतः कॅथलीनची भेट घेण्यासाठी तिच्या घरी गेली. जॅकच्या मुलाला तिने जन्म दिला. आता तो ९ महिन्यांचा झाला आहे. सोबतच, आता जॅक सुद्धा १८ वर्षांचा झाला आहे. आता आम्ही सगळेच खुश आहोत. जॅक सुद्धा सर्व काही सांभाळून घेतो, तो आता मोठा झाला आहे असे कॅथलीनने सांगितले.

आपल्या सोशल मीडिया पोस्टवर कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, ती आणि जॅक बाळाला जन्म देण्यापूर्वी ५ वेळा हॉस्पिटलला जाऊन आले होते. तरीही डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा रुग्णालयात गाठला आले नाही. यानंतर तिने डॉक्टरांशी फोनवर संवाद साधला आणि घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना विलंब होईल याची खबरदारी घेत जॅकने स्वतःच तिची मदत केली. त्याच्याच मदतीने कॅथलीनने बाळाला जन्म दिला. तो पूर्णपणे सुदृढ आणि निरोगी होता.

Leave a Comment