जपानात बनला उडणारा ड्रॅगन ड्रोन


हवेत उडतानाच वारंवार आकार बदलणारा रोबो ड्रॅगन ड्रोन जपानी संशोधकांनी तयार केला आहे. टोक्यो विद्यापीठ मधील संशोधकांनी हे वेगळे डिझाईन तयार केले असून हे ड्रॅगन ड्रोन कुठेही उडत जाऊ शकते. त्याचा आकार लहान मोठा, वेडावाकडा कसाही होऊ शकतो. यासाठी छोटे छोटे मोड्यूल्स बनवून ते इंटरलॉकिंगने एकत्र जोडले गेले आहेत. सध्या अशी चार मोड्यूल्स जोडली गेली आहेत मात्र लवकरच अशी १२ मोड्यूल्स जोडून विशालकाय ड्रॅगन ड्रोन तयार केले जाणार आहे.

संशोधकांच्या मते या ड्रॅगन ड्रोनचे हार्डवेअर डिझाईन कमालीचे बनले आहे. भविष्यात यातून फ्लाइंग मशीनची अनेक अवघड कामे हवेतच हे ड्रोन करू शकतील. मुळात हे ड्रॅगन ड्रोन हवेत उडतानाचा आकार बदलू शकत असल्याने विविध स्थितीत येऊन एकाचवेळी अनेक कामे तो करू शकणार आहे.