बँक ऑफ चायनाला रिझर्व बँकेची परवानगी


बँक ऑफ चायना तर्फे भारतात व्यवसाय सुरु करण्यासाठी मागितल्या गेलेल्या परवान्याला रिझर्व बँकेने मान्यता दिली असून त्य संदर्भातला सिक्युरिटी क्लिअरन्स अर्ज २०१६ मध्ये केला गेला होता. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग याच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी बँक ऑफ चायनाला भारतात व्यवस्याय परवाना दिला जाईल असा शब्द मोदिनी दिला होता असे समजते. या परवानगीमुळे बँक ऑफ चायना भारतात व्यवसाय करणारी दुसरी चीनी बँक ठरली आहे. या बँकेची पहिली शाखा मुंबई मध्ये सुरु होणार आहे. चायनाची सरकारी बँक हाँगकाँग अँड शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर अगोदरच लिस्ट झाली आहे.

बँक ऑफ चायनाची मार्केट कॅप १०.८५ लाख कोटी आहे. या बँकेवर इस्त्रायलवर सतत दहशतवादी हल्ले करणाऱ्या हमास या संघटनेला फंडिंग केल्याचा आरोप होता मात्र चीन सरकारने तो फेटाळून लावला होता. या आरोपामुळे भारतात या बँकेला परवाना मिळण्यास विलंब झाल्याचे सांगितले जाते.

इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने जानेवारी २०१८ मध्ये भारतात व्यवसाय सुरु केला आहे. बँक ऑफ चायनाच्या आगमनानंतर भारतात व्यवसाय करणाऱ्या विदेशी बँकांची संख्या ४६ वर गेली आहे. युकेची स्टँडर्ड चार्टर्ड हि भारतातील सर्वाधिक १०० शाखा असणरी विदेशी बँक आहे. इराणच्या ३, दक्षिण कोरियाच्या दोन तर नेदरलंड व मलेशियाच्या प्रत्येकी एक बँकेने भारतात शाखा सुरु करण्यास रिझर्व बँकेकडे परवानगी मागितली आहे त्यावर अजून निर्णय घेतला गेलेला नाही.

Leave a Comment