
नवी दिल्ली – विमानामध्ये देण्यात येणारा ‘हिंदू मील’ बंद करण्याचा निर्णय दुबईची विमान कंपनी अमीरात एअरलाइन्सने घेतला असून हा पर्याय अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या काही कंपन्यांकडून प्रवाशांना दिला जातो, प्रवासी त्यानुसार आपल्या धार्मीक आस्थेनुसार स्वतःचे भोजन ठरवतात. पण आता ‘हिंदू मील’ हा पर्याय बंद करण्याचा निर्णय अमीरात एअरलाइन्सने घेतला आहे.
अमीरात एअरलाइन्सने बंद केला ‘हिंदू मील’चा पर्याय बंद
आम्ही सातत्याने प्रवाशांकडून आमच्या सेवेबद्दल अभिप्राय मागवत असतो आणि आम्ही ‘हिंदू मिल’ हा पर्याय बंद करण्याचा निर्णय आतापर्यंत मिळालेल्या अभिप्रायच्या आधारेच घेतला असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमानामध्ये हिंदू ग्राहक खानपानाची सेवा पुरवणाऱ्या आउटलेटमधून अॅडव्हान्समध्ये शाकाहारी जेवण ऑर्डर करु शकतात, असे कंपनीकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. जैन जेवण, भारतीय शाकाहारी जेवण, बिफ नसलेले विशेष जेवण यासारखे अनेक पर्याय यामध्ये आहेत, आपल्या आवडीनुसार हिंदू प्रवाशी विमानाच्या कोणत्याही श्रेणीत जेवण ऑर्डर करु शकतात. पण यापुढे कंपनीकडून ‘हिंदू मील’चा पर्याय हटवला जाईल, असे अमीरात एअरलाइन्सने सांगितले.
