एटीएम व्यवहार शुल्कात वाढ होण्याची शक्यता


नवी दिल्ली : एटीएम वापरणे येत्या काही महिन्यांत महागडे ठरण्याची शक्यता असून कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमच्या अपग्रेडेशनबाबत आदेश दिल्यामुळे ‘एटीएम’च्या व्यवस्थापन खर्चांत वाढ हेण्याची शक्यता असून, संबंधित उद्योगाने त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी एटीएमच्या शुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे.

सध्या एटीएम उद्योग तोट्यात असल्याचे मत ‘कॉन्फेडरेशन ऑफ एटीए इंडस्ट्री’ने (सीएटीएमआय) मांडले आहे. त्यातच एटीएमच्या अपग्रेडेशनमुळे खर्चांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एटीएम व्यवहार शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सीएटीएमआय’ने यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे. २५ टक्क्यांनी एटीएम व्यवस्थापन खर्चात वाढ होण्याची शक्यता असून त्यातच पुन्हा बँकांच्याही खर्चांत वाढ होण्याची शक्यता आहे. एटीएमचे शुल्क वाढल्यास बँकांच्या खर्चांतही ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. एटीएम उद्योग सध्या आधीच तोट्यात आहे. रोख व्यवहारांसाठी (कॅश ट्रॅन्झॅक्शन) केवळ १५ रुपयांचे आणि नॉन कॅश व्यवहारांसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाते. ग्राहकांकडून हे शुल्क आकारले जात नाही. मोफत व्यवहारांची संख्या संपल्यानंतर जर ग्राहकाने अतिरिक्त व्यवहार केल्यास त्याला शुल्क द्यावे लागते. हे शुल्क २०१२मध्ये निर्धारित करण्यात आले. तेव्हापासून त्यात बदल करण्यात आले नाहीत.

Leave a Comment