‘व्हॉट्सअॅप’ला केंद्र सरकारचा इशारा


नवी दिल्ली – इन्स्टंट मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ला केंद्र सरकारने अफवांमुळे देशभरात होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला असून अफवा पसरवण्यासाठी व्हाट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मचा होत असलेला गैरवापर ही भारतासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. या घटनांची तसेच व्हाट्सअॅपवरुन प्रसारित होणाऱ्या उत्तेजक अफवांची मंत्रालयाने नोंद घेतली असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

बनावट संदेशांमुळे होणाऱ्या घटनांची आणि गोंधळाची माहिती व्हाट्सअॅपच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला देण्यात आली आहे आणि ताबडतोब बनावट संदेश रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. उत्तरदायीपणा आणि जबाबदारी व्हाट्सअॅपसारखे व्यासपीठ टाळू शकत नाही. चांगल्या तंत्रज्ञानाचा उपयोग काही समाजकंटकांमुळे चुकीचे संदेश पसरवण्यासाठी केला जात असल्यामुळे हिंसा पसरते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. मागील आठवड्यात धुळ्यामध्ये मुले चोरणार टोळी समजून ५ जणांची जमावाने हत्या केली.

Leave a Comment