
मुंबई : मार्च महिन्यात जिओफाय हॉटस्पॉटची सुविधा ९९९ रुपयांच्या किमतीसह ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने उपलब्ध केली होती. पण आता या जिओफाय हॉटस्पॉटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ग्राहकांना आता अवघ्या ४९९ रुपयांत जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.
९९९ रुपयांचा जिओफाय हॉटस्पॉट आता अवघ्या ४९९ रुपयांत
एक वर्षाची वॉरंटीदेखील जिओफाय हॉटस्पॉट डिव्हाईसवर देण्यात आली आहे. या हॉटस्पॉट डिव्हाईसवर ग्राहकांना १५०एमबीपीएस डाऊनलोड स्पीड तर ५० एमबीपीएसचे अपलोड स्पीड मिळू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली असली तरी ही ऑफर मिळण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत.
जिओचे पोस्टपेड कनेक्शन जे ग्राहक घेतील आणि नंतर त्याचा वापर जिओफाय डिव्हाईसमध्ये करतील, अशा ग्राहकांनाच या ऑफरचा फायदा मिळू शकेल. जिओ पोस्टपेड ग्राहकांना या ऑफरसोबतच कॅशबॅकही मिळणार आहे. पाठोपाठ १२ बिलिंग सायकल पूर्ण केल्यावर ग्राहकांना ५०० रुपये कॅशबॅक मिळेल.
