जून महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा झाले तब्बल ९५ हजार ६१० कोटी


नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) जूनमधील संकलनात वाढ झाल्याची माहिती दिली असून मंत्रालयाने जूनमधील संकलन ९४ हजार ०१६ कोटींवरुन वाढून ९५ हजार ६१० कोटी झाल्याचे जाहीर केले आहे.

नुकतेच भारतात जीएसटी करप्रणाली लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. जीएसटीचे मासिक सरासरी संकलन गेल्या आर्थिक वर्षात ८९ हजार ८८५ कोटी झाले आहे. जीएसटीच्या एकूण संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी १५ हजार ९६८ कोटी, राज्य जीएसटी २२ हजार ०२१, एकात्मिक जीएसटी ४९,४९८ (आयातीमधून २४ हजार ४९३ कोटी) आणि सेस ८ हजार १२२ कोटी (आयातीमधून ७७३ कोटी)चा समावेश आहे. एकूण ६४.६९ लाख जीएसटीआर ३ बी रिटर्न्स मे ते जून २०१८ या कालावधीत दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment