
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हनरपदी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार जैन यांची सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. ३ वर्षांसाठी ही नियुक्ती असेल, अशी माहिती आर्थिक सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी ट्विटरद्वारे दिली.
महेश कुमार जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हनरपदी नियुक्ती
जैन हे बी. पी. कनुंगो, व्हायरल व्ही. आचार्य, आणि एनएस विश्वनाथन यांच्यानंतर नियुक्ती होणारे चौथे डेप्युटी गर्व्हनर आहेत. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ बँकेचा अनुभव असलेल्या जैन यांनी निर्यात-आयात बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक), आयबीपीएस आणि एनआयबीएम यासह विविध बँकांच्या संचालक मंडळांवर काम केले आहे. भारतीय बँक असोसिएशनच्या (आयबीए) जोखीम व्यवस्थापन समितीचेही ते सदस्य आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकनांच्या अहवालांचे ते पुनर्रचना करत आहेत.
