नव्या अवतारात आली स्कॉर्पियो


महिंद्राच्या स्कॉर्पिओला पंजाबच्या रस्त्यांपासून ते अगदी केरळच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पसंती दिली जाते. ग्राहकांच्या मागणी आणि गरजांनुसार नवा टच अशा या एसयूव्हीला देण्यात आला असून, खिशाला परवडेल अशा दरात ती कंपनीने बाजारात आणली आहे.

स्कॉर्पिओचा हा नवा लूक एसपी डिझाईन स्टुडिओने डिझाईन केला असून, त्यासाठीची प्रेरणा फोर्ड रॅप्टरपासून घेण्यात आली आहे. एसयूव्ही आणि पिकअप वेहिकलची झलक उंच आणि अवाढव्य वाटणाऱ्या या स्कॉर्पिओमध्ये एकाच वेळी पाहायला मिळत आहे. फोर्ड रॅप्टरपासून प्रेरित असलेल्या या स्कॉर्पिओच्या बंपर आणि हेडलाइटचे डिझाईनही प्रचंड आकर्षक आहे. याच्या हेडलॅंप क्लस्टरमध्ये उभ्या रेषेत प्रोजेक्टर हेडलँप लावण्यात आले असून, पुढच्या बंपरवर एलइडी फॉग लँप लावण्यात आले आहेत.

स्कॉर्पियोसोबत देण्यात आलेली स्टेफनी ही मागच्या बाजूला अशा पद्धतीने बसवण्यात आली आहे, जी पाहता हे पिकअप वेहिकल असल्याचाच भास होतो. पण, याच्या इंजिनमध्ये काहीच बदल करण्यात आले नाही. एसपी डिझाईन स्टुडिओला दोन महिन्यांचा कालावधी ही स्वप्नवत स्कॉर्पिओ एका वेगळ्याच रुपात सादर करण्यासाठी लागला. हा संपूर्ण कायापालट करण्यासाठी सात लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे या स्कॉर्पिओचा विचार अनेकजण करुच शकतात.

Leave a Comment