
महागड्या कार्स बनविणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अॅस्टन मार्टिन कंपनीचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीने त्यांच्या डीबी सिरीज मधली नवी फ्लॅशशिप कार डीबी ११ एएमआर नावाने सादर केली असून ही कार अगोदरच्या मॉडेलपेक्षा अधिक पॉवर असलेली आणि उत्तम परफॉरमन्स देणारी असल्याचा दावा केला आहे. या कारचे डिझाईन आकर्षक बनविले गेले आहे.
अॅस्टन मार्टिनची डीबी ११ एएमआर कार
या कारला ५.२ लिटरचे वि १२ इंजिन दिले गेले असून ० ते १०० किमीचा वेग ती ३.७ सेकंदात घेते तर तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३३४ किमी. कारच्या डिझाईनमध्ये आत आणि बाहेर कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. अर्थात कंपनीची टिपिकल फॅशन या कारमध्येही आहेच. कारचे फ्रंट आणि बॅकचे डिझाईन अधिक सुबक बनविले गेले आहे.
कारला फ्लॅट बॉटम स्टीअरिंग व्हील, रेसिंग सीट्स, डूअल एग्झोस्ट दिला गेला आहे. या कारचे एक एक्स्क्लुझिव सिग्नेचर मॉडेल ग्रीन लाईम रंगात सादर केले गेले असुन त्याची किंमत आहे १.८४ कोटी रुपये.
