जपानी कंपनीने आणला जगातील पहिला पॉकेटसाईज संगणक


जपानी टेक कंपनी किंग जिमने जगातील पहिला पॉकेट साईज मिनी संगणक फोल्डिंग कि बोर्डसह सादर केला असून त्याचे नाव ई इंक टाईपरायटर असे आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व ई बुक रीडर व टॅब्लेटवर सहज सुलभ टायपिंग सुविधा देणारे हे पहिलेच उपकरण असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हि कंपनी पोमेरा नावाने खूप छोट्या आकाराचे टायपिंग संगणक बनविते.


या सिरीजमधला हा नवा संगणक कुठेही न्या असा असून गरज असेल तेव्हा कीबोर्ड उघडा, काम करा, संपले की कीबोर्ड सह पूर्ण फोल्ड करून खिशात घाला या पद्धतीचा आहे. यात टाईप केलेले टेक्स्ट क्यूआर कोड किंवा मायक्रोएसडी च्या सहाय्यने ट्रान्स्फर करता येणार आहे. कीबोर्ड तीन फोल्ड घालून बंद करता येतो तसेच ६ इंची पेपर स्क्रीन डिस्प्ले याला दिला गेला आहे. अमेरिकेत हा संगणक ३४९ डॉलर्स मध्ये उपलब्ध करून दिला गेला आहे. त्यानंतर तो जपान मध्ये लाँच केला जाणार आहे.

Leave a Comment