भारतात लाँच झाली होंडाची अॅमेझ


होंडाने आपली सेकेंड जनरेशनची अॅमेझ भारतात लाँच केली आहे. या होंडा अॅमेझची किंमत कंपनीने ५.५९ लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवली आहे. या कारसाठी देशभरात होंडा डिलर्सने सुरूवातीपासूनच बुकिंग घ्यायला सुरूवात केली आहे. आशा आहे की, पुढच्या आठवड्यात याची डिलिव्हरीला देखील सुरूवात होईल.

२०१८ होंडा अमेझचे चार वेरिएंट असून होंडा अॅमेझ E, होंडा अॅमेझ S, होंडा अॅमेझ V आणि होंडा अॅमेझ VX सादर केले आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारमध्ये फोर सिलेंडर असून १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. ज्याची ९० पीएस पावर आणि ११० एनएमचे टार्क जेनरेट देण्यात आले आहेत. यामध्ये १.५ लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये १०० पीएसचे पावर आणि २०० एनएम टॉर्क जेनरेट केले आहे.

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीमध्ये ट्रान्समिशनसाठी सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. होंडाने पहिल्यांदा जेव्हा भारतामध्ये डिझेल इंजिनमध्ये सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या नव्या अॅमेझच्या डिझाइनमध्ये भरपूर स्पेस देण्यात आली आहे. होंडाने रिअरमध्ये व्हीलबेस वाढवण्यात आले आहे. सेफ्टीसाठी नवीन कारच्या सर्व वेरिएंट्समध्ये फ्रंट एसआरएस एअरबॅग्स, इबिडी इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन देण्यात आले आहे. एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंगसोबत ब्रेक असिस्ट देण्यात आले आहे.

Leave a Comment