भारतात लॉन्च झाली टोयोटाची सिडेन कार ‘यारिस’ !


टोयोटा कंपनीने आपली बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार नुकतीच भारतात लॉन्च केली असून भारतात या आकर्षक कारचे ४ व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत.

ग्राहक ही कार सध्या ५० हजार रुपये देऊन बुक करु शकतात. यारिस या कारची किंमत ८.५ लाख रुपयांपासून सुरु होते. ही केवळ पेट्रोल इंजिनची किंमत आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १४.०७ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. आकर्षक ६ रंगांमध्ये ही कार मिळणार आहे. टोयोटाने ही कार ४ व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यात मॅन्यूअल आणि सीवीटी ऑटोमॅटीक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

या कारमध्ये १.५ लीटरचे ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते १०७ बीएचपीची पॉवर आणि १४० न्यूटन-मीटरचा टॉर्क जनरेट करते. यारिस कारमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल आणि ७ स्पीड सीवीटी ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय मिळणार आहे. या कारच्या टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये गेस्चर कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच कारमध्ये 7 एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment