गुगल आमचा तुझ्यावर भरवसा नाय नाय…


नवी दिल्ली- प्रत्येक गोष्टींची एकदम अचूक जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगलवर सहज उपलब्ध होते. गुगल आपल्याला आवश्यक ती माहिती अगदी काही क्षणात देतो, असा आपल्या सगळ्यांचाच गोड गैरसमज आहे. पण गुगल सध्या ज्या एका प्रश्नाचे जे उत्तर देत आहे, ते बघून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोलिंग सुरू झाले आहे.

तुम्ही गुगलवर भारताचे पहिले पंतप्रधान कोण? (India first PM) असे सर्च केल्यानंतर समोर येणारे उत्तर पाहून सगळ्यांनाच धक्का बसत आहे. गुगलवर भारताचे पहिले पंतप्रधान कोण? असे सर्च केल्यावर नाव जवाहरलाल नेहरुंचे तर फोटो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा येत आहे. सोशल मीडियावर गुगलवर मिळणाऱ्या या उत्तराचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.


विकीपीडीयाच्या हवाल्याने गुगलकडून हे उत्तर दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो विकीपीडीयावरही पहिला दिसतो आहे. एल्गोरिदम काही प्रश्न विचारल्या गेल्यावर स्वतःहून वेब पेजवरील फोटो उचलतो, असे स्पष्टीकरण गुगलने याआधी दिल्यामुळे गुगलच्या या उत्तरावरही सोशल मीडियावर प्रश्न विचारेला जात आहेत.

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी गुगलची ही चूक ट्विट करत लक्षात आणून दिली आहे. @Google @GoogleIndia तुमचे कुठले एल्गोरिदम याला परवानगी देते. तुम्ही पूर्णपणे भंगार आहात, असे त्यांनी ट्विटमध्ये आपल्या म्हटले आहे.

Leave a Comment