नवी दिल्ली – तुमच्या पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात जमा केली नाही, तर आता एसएमएस व ईमेलद्वारे त्याची माहिती मिळणार आहे. आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) अलर्ट देणार असल्यामुळे पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
आता कंपनीने पीएफ न भरल्यास मिळणार मेसेज आणि ई-मेलमार्फत माहिती
सदस्यांसाठी खास सुविधा इपीएफओने सुरू केली असून कर्मचाऱ्यांचा पीएफ एखाद्या कंपनीने जमा केला नाही, तर इपीएफओ त्या कर्मचाऱ्यांना मेसेज आणि मेलकरून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये आहे. पण या सुविधेसाठी कर्मचाऱ्याचा मोबाइल नंबर आणि इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) बरोबर लिंक असणे गरजेचे आहे.
याविषयी कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, सदस्यांसाठी इपीएफओने सुरू केलेल्या नव्या सुविधेतून त्यांना त्यांच्या खात्यातील पीएफच्या रक्कमेची माहिती एका एसएमएसवर किंवा मिस्ड कॉलवर मिळणार आहे. याशिवाय सदस्य इ-पासबुकही पाहू शकता. ज्यामुळे त्यांना पीएफच्या पैशांबद्दल माहिती मिळेल. काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापतात पण ते अकाऊंटमध्ये जमा करत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आता इपीएफओने त्या कंपन्यांना नोटीसी बजावल्या आहेत.