
मॅकबूक प्रो बॅटरी फ्री रिप्लेस करण्याची घोषणा अॅपलने केली असून आपल्या सपोर्टपेजवर कंपनीने म्हटले आहे की, १३ इंचीच्या नॉन टॉच बार ‘मॅकबूक प्रो’चे काही युनिट्स बॅटरीमुळे फेल झाले असल्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नाही. पण ज्यात मॅकबूकमध्ये ही अडचण आली आहे, असे मॅकबूक ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ च्या दरम्यान बनवण्यात आले होते. तुमच्याकडे जर मॅकबूक आहे आणि बॅटरी रिप्लेस करण्याच्या लायक आहे किंवा नाही, हे आपला मॅकबूक सिरियल नंबर चेक करून पाहता येणार आहे, अॅपलच्या सपोर्ट पेजवर यासाठी लिंक दिली आहे.
‘मॅकबूक प्रो’ची बॅटरी ‘फ्री रिप्लेस’ करणार अॅपल
तुमच्या लॅपटॉपमध्ये जर ही समस्या दिसून आली, तर तुम्हाला कोणत्याही अधिकृत अॅपल रिपेअर सेंटर, रिटेल स्टोअर अथवा अॅपल सर्व्हिस सेंटरवर लॅपटॉपला घेऊन जावे लागेल, तुम्हाला तेथे फ्रीमध्ये बॅटरी बदलून दिली जाईल. कंपनीने असे म्हटले आहे की, बॅटरी बदलताना ज्या युझर्सने पैसे दिले असतील, त्यांना पैसे परत केले जातील.
