कुलर वापरत असाल तर ‘ही’ काळजी नक्की घ्या


सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे गरम होत आहे. आणि लोक फॅनपेक्षा कुलर आणि एसीला अधिक पसंत देत आहेत. उन्हाळा याच्या वापराने आरामदायी वाटत असला तरी सुरक्षित वापर न केल्याने विपरितही घडत आहे. कुलरमध्ये पाणी भरुन त्याचा वापर करावा लागतो, हे तुम्हाला माहितीच आहे. पाणी भरतानाही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. नाहीतर, याचे घातक परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

कुलरचा वापर ‘थ्री पीन प्लग’ वरच करावा. घरात ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स’ बसवून घ्यावेत. ‘अर्थिंग’ योग्य असल्याची तपासणी सातत्याने करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कूलरचा वीज प्रवाह बंद करून ‘प्लग’ काढावा आणि मगच त्यात पाणी भरावे. कुलर लाकडी स्टॅण्डवर ठेवावा. कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी. कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्या. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करणे टाळा. कुलरची वायर सदैव तपासून बघा.

फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर प्राधान्याने करावा. घरातील मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून टिल्लू पंप सुरू करू नये. पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा बंद करून त्याचा ‘प्लग’ काढल्यानंतरच पंपाला हात लावावा. पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडलेली नसावी. याचे ‘अर्थिंग’ योग्य असल्याचे तपासून घ्यावे. पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहित होणार नसल्याची काळजी घ्यावी.

Leave a Comment