भारतात बोईंग बनविणार एफए१८ सुपरहॉर्नेट लढाऊ जेट

भारतीय हवाईदलाला लवकरच आकाशातील महायोद्धा अशी ओळख असलेली सुपरहॉर्नेट लढाऊ जेट भक्कम ताकत प्रदान करणार आहेत. कारण जगातील प्रमुख लढाऊ विमाने बनविणारी कंपनी बोईंग भारतीय कंपन्याच्या सहकार्याने मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारतच या विमानांचे उत्पादन करणार आहे. गुरुवारी चेन्नई येथे पंतप्रधान मोदी याच्या हस्ते उद्घाटन झालेल्या डिफेन्स एक्स्पो मध्ये या संदर्भातली घोषणा केली गेली. बोईंग एचएएल आणि महिद्र डिफेन्स सिस्टीन याच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरु करत आहे.

 

बोईंग इंडियाचे अध्यक्ष प्रत्यूष कुमार यावेळी म्हणाले भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संयुक्त विकासासाठी हे काम केले जात आहे. एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी सुवर्ण राजू म्हणाले या करारासंदर्भात गेले १८ महिने चर्चा सुरु होती. मात्र आता करार झाल्याने त्याचे काम सुरु होत आहे. एचएएल ही भारतातली एकमेव लढाऊ विमाने बनविणारी कंपनी आहे तर महिंद्र हि एकमेव छोटी व्यावसायिक विमाने बनविणारी कंपनी आहे. या कंपन्यांना आता बोईंग सारख्या बड्या कंपनीची मदत मिळते आहे.

 

या प्रकल्पात होणारी गुंतवणूकही प्रचंड असेल. एफ १८ विमाने ताशी २ हजार किमी वेगाने उडू शकतात. त्याच्या उत्पादनासाठी येणारा खर्च अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत कमी असतोच पण त्यांची ऑपरेटिंग कॉस्टहि कमी येते. दोन इंजिनांचे हे विमान अनके भूमिका पार पाडू शकते. त्याची रेंज ३३३० किमीची आहे.