टीसीएस रिलायन्सला मागे टाकून बनली देशाची मूल्यवान कंपनी


देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टीसीएस ने गुरुवारी ६ लाख कोटी गुंतवणुकीचा बाजार स्तर पार करून देशातील सर्वात मूल्यवान कंपनी बनण्याची कामगिरी बजावली. यावेळी टीसीएस ने रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकून हे स्थान पटकावले.

गुरुवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा टीसीएसने ६,००,५६९.४५ कोटीचा टप्पा गाठला आणि मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ४.०४ टक्के वाढून ३१३७.३० वर बंद झाला. एकवेळ या शेअरने ३१५० चा दर गाठला होता. टीसीएस मधील गुंतवणूक रिलायन्सच्या ५,८७,५७०.५६ कोटीच्या तुलनेत १२,९९८.८९ कोटी ने अधिक होती. यावेळी रिलायन्सच्या शेअर मध्ये घसरण होऊन तो ९२७.७५ वर आला. अन्य कंपन्यात टीसीएस व रिलायन्स नंतर तीन नंबरवर एचडीएफसी बँक, चार नंबरवर आयटीसी, तर पाच नंबरवर एचडीएफसी असा क्रम होता.

Leave a Comment