
मुंबई : रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल)च्या मुहूर्तावर आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे. आयपीएल सीजनसाठी बीएसएनएलने २५८ रुपयांमध्ये १५३ जीबी डेटा सादर केला आहे. ५१ दिवसांची याची व्हॅलिडीटी असून आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीव्ही-२४८ बीएसएनएल सादर करत आहे. प्रीपेड ग्राहकांना यात (दररोज ३ जीबी) अनलिमिटेड डेटा मिळेल.
आयपीएलच्या मुहूर्तावर बीएसएनएल नवा प्लॅन
ग्राहकांना बीएसएनएलने आणलेल्या ऑफरमुळे अत्यंत स्वस्त दरात आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग करता येईल. रिलायन्स जिओने यापूर्वी आयपीएल सीजनसाठी २५१ रुपयांमध्ये १०२ जीबी डेटा पॅक देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर भारती एअरटेलनेही सांगितले होते की, टी.व्ही. वर हॉटस्टारच्या माध्यमातून आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग निःशुल्क उपलब्ध होईल.
