अवघ्या २ रुपयांत मिळणार वायफाय सुविधा


नवी दिल्ली : भारताला डिजिटल बनवण्यासाठी सर्वत्र इंटरनेट उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु असून टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने इंटरनेटचे नवे मॉडल सादर करत मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर (POD) बनवण्याची कल्पना सुचवली आहे.

टेलिकॉम बूथप्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स (PDO) सुरु करण्याची आयडिया ट्रायने दिली असून वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स लावण्यात येणार असल्यामुळे तब्बल ९० टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे आणि नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळेल.

पब्लिक वाय-फायचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ट्रायने देशातील इंटनेट सुविधा वाढविण्यासाठी सादर केला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत ब्रॉडबँडमध्ये भारत पिछाडीवर आहे. खास करुन ग्रामिण भागांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिविटी नाही. यामुळे आता ट्राय लहान कंपन्यांच्या माध्यमातून वाय-फाय कनेक्टिव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रायच्या मते, PDO मध्ये वाय-फाय सुविधेसाठी युजर्सला केवळ २ रुपये मोजावे लागणार आहेत.

या संदर्भातील एक मॉडल ट्रायने तयार करुन टेलिकॉम विभागाला पाठवले आहे. यामध्ये सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्स एका प्लॅटफॉर्मवर येऊन इंटरनेट अॅक्सेस, सर्व्हिसेज, पेमेंट आणि अथाँटिकेशन उपलब्ध करुन देऊ शकतात. ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी सांगितले की, ‘डिजिटल इंडिया’ चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रॉडबँड इंटरनेट एक महत्वाचा भाग आहे. तसेच वाय-फाय हे सर्वात स्वस्त माध्यम आहे ज्याची किंमत कमी आहे आणि स्पेक्ट्रम फ्री आहे.

Leave a Comment