दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा अभिमानास्पद धडा !


मुंबई: नवा कोरा आणि अभिमानास्पद धड्याचा दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा मराठीच्या पुस्तकात सांगण्यात आली आहे.

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या लेफ्टनंट स्वाती महाडिक या पत्नी असून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले होते.

उच्चशिक्षीत स्वाती यांनी पतीच्या वीरमरणानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणेच पसंत केले. गेल्या वर्षी भारतीय सैन्यात स्वाती महाडिक लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. आता दहावीच्या पुस्तकात त्यांची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात आली आहे. पती निधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून, पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा दहावीच्या पुस्तकात मांडण्यात आली आहे. दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके नुकतीच बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दहावीचे उन्हाळी वर्गही सुरुवात होत आहेत.

Leave a Comment