
योगगुरू रामदेवबाबा यांचे पतंजली आयुर्वेद २०१९ मध्ये तयार कपडे बाजारात प्रवेश करण्यास तयार असल्याची घोषणा रामदेवबाबा यांनी भारतीय जाहिरात संघटनेव्ह्या फेस्ट २०१८ या कार्यक्रमात बोलताना गोवा येथे केली. ते म्हणाले ग्राहकांकडून आम्हाला पतंजलीचे तयार कपडे कधी मिळणार अशी वारंवार विचारणा होत आहे. आम्ही जीन्स सह पुरुष, महिला आणि मुलांसाठी पारंपारिक कपडेही बाजारात आणत आहोत.
पतंजली तयार कपडे बाजारात उतरण्यास सज्ज
पतंजली आयुर्वेद औषधे, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ अशी अनेक उत्पादने बाजारात विकत आहे. आता त्यात तयार कपडे, स्पोर्ट्स आणि योगा गारमेंटची भर पडत आहे. पतंजलीने व्यवसायत उत्तम जम बसविल्याचे सांगून रामदेवबाबा म्हणाले, आम्ही कंपनीत मोठ्या पगारावर काम करणाऱ्या प्रोफेशनल ऐवजी कंपनीसाठी तळमळीने काम करनारयाना प्राधान्य देत आहोत. तसेच जाहिरातीसाठी सेलेब्रिटी आणत नाही कारण त्यामुळे पैशाची बचत होते. ते स्वतः यापुढे पतंजलीच्या जाहिराती करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
