मंगळाचा शोध घेणार माश्या


लवकरच मंगळावरही पृथ्वीप्रमाणे माश्यांच्या झुंडी उडताना दिसणार आहेत. अर्थात या रोबो माश्या असतील आणि मंगळावरील विविध भागांचा शोध त्या घेतील. मार्सबीज या नावाने हे रोबो तयार केले गेले असून ते आपल्याकडच्या माशांसारखे आहेत. फक्त त्यांचे पंख अधिक मोठे आहेत. चीन आणि अमेरिकी संशोधकांनी या माश्या तयार केल्या असून या प्रकल्पाला नासा फंडिंग करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळावर पृथ्वीच्या तुलनेत वातावरण विरळ आहे. त्यामुळे रोबो माशांना सहज त्या वातावरणात उडता यावे यासाठी त्यांचे पंख आकार मोठे आहेत. त्यावर सेन्सर आणि कम्युनिकेशन उपकरणे बसविली गेली आहेत. यामुळे मंगळाची मानचित्रे हे रोबो काढू शकतात. तसेच या माश्या मंगळावरील मातीचे नमुने गोळा करणे, मिथेन वायू उत्सर्जन होत आहे काय याचा शोध घेऊ शकतील. हि सर्व माहिती मंगळावर अगोदरच पाठविण्यात आलेल्या रोव्हरशी सलग्न करता येणार आहे. या माश्याची बॅटरी संपत आली कि त्या स्वतः येथे चार्ज होणार आहेत.

मंगळावर २०१२ साली रोव्हर पाठविले गेले आहे मात्र त्याचा वेग खूपच कमी आहे. या काळात रोबोने मंगळावर फक्त १८ किमी अंतर पार केले आहे. या तुलनेत रोबो माशा अधिक वेगाने काम करू शकणार आहेत असे सांगितले जात आहे.

Leave a Comment