रेल्वेरुळांवर भरतो थायलंडचा मॅक्लोंग बाजार


जगभरात कुठ्ल्याही देशात गेलो तरी तेथील बाजार पाहण्याची मजा काही और असते. भले आपल्याला काही खरेदी करायची असो वा नसो, बाजारात नुसते हिंडणे हाही मनोरंजनाचा प्रकार असतो. थायलंड मधील असाच एक अनोखा बाजार मुद्दाम जाऊन पाहण्यासारखा आहे. हे मार्केट थायलंड मधील मोठ्या बाजारांपैकी एक आहे.

या मार्केटचे खास वैशिष्ट म्हणजे ते रेल्वे रुळांवर भरते आणि दिवसातून रेल्वेच्या याच्यामधून किमान आठ फेऱ्या होतात. या बाजारात भाजी, फळे, कापडचोपड, दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, फुले अश्या सर्व वस्तू मिळतात आणि त्या अतिशय आकर्षक पद्धतीने सजविलेल्या असतात. रुळांवरच दुकानदार त्यांचा माल मांडतात. रेल्वेची वेळ झाली कि अतिशय गोड आवाजात स्पीकरवरून सूचना दिली जाते आणि दुकानदार त्वरित त्यांचा माल रुळावरून हलवितात आणि रेल्वे गेली कि पुन्हा मांडतात.


टॅलट रॉम हूप मार्केट असेही या मार्केटचे नाव आहे. त्याचा अर्थ आहे अम्ब्रेला क्लोज मार्केट. म्हणजे रेल्वे गाडीचा धूर दिसला कि रुळावरचा माल रुळावरून थोडा खाली घ्यायचा. येथे दुकानदार आणि ग्राहक दोघेची रेल्वेच्या अगदी शेजारी उभे राहून खरेदी विक्री करत असतात. हे मार्केट बरेच मोठे आहे मात्र स्टेशनजवळ अधिक गर्दी असते. जसजसे आपण स्टेशनपासून लांब जाऊ तशी या बाजाराची गर्दी कमी होते.

Leave a Comment