
नवी दिल्ली : गुगल प्ले इंस्टेंट गुगलने लॉन्च केले असून युजर्स या फिचरच्या मदतीने प्ले स्टोरमध्ये गेमचे प्रीव्हू पाहु शकाल.याचा अर्थ तुम्ही प्ले स्टोर अॅप इनस्टॉल आणि डाऊनलोड केल्याशिवायच गेमचे प्रीव्हू पाहु शकाल. गुगल प्ले इंस्टेंट, गुगल प्ले स्टोर, गुगल प्ले गेम्स आणि अन्य प्लेटफॉर्म्स गेम्स उपलब्ध आहे.
आता विना डाऊनलोड खेळा गेम्स
गुगल प्ले गेम्स अॅपच्या रिडिझाईन्सची घोषणा गुगलने केली आहे. अनेक नवे फिचर्स यात उपलब्ध करुन दिले आहेत. प्ले गेम्स अॅपमध्ये गुगलने नवे UI अपग्रेड्स करण्यासोबतच नव्या इंस्टेंट कॅटेगरी सादर केल्या आहेत. अपडेट करण्यासोबत अॅपने Arcade टॅब दिला आहे. युजर्स याच्या अंतर्गत व्हिडिओ ट्रेलर्स देखील पाहु शकतील. त्याचबरोबर त्यात सर्च टॅब अपडेट करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत अनेक फिल्टर्स देण्यात आले आहे. तुम्हाला फिल्टर्सच्या मदतीने गेम्स शोधायला कॅटगरी देण्यात आली आहे. अन्य UI अपग्रेड्ससह फुल स्क्रीन स्क्रीनशॉट्स आणि डिव्हाईस कम्पेटिबिलिटी साठी नवीन ड्राप डाऊन मेन्यू सुरू करण्यात आले आहे.
काही ठराविक गेम्ससाठी अॅपमध्ये नवीन गुगल प्ले इंस्टेंट टॅब देण्यात आले आहे. गुगल प्ले इंस्टेंटच्या प्रॉडक्ट मॅनेजर जोनाथनने सांगितले की, गुगल प्ले इंस्टेटच्या माध्यमातून फक्त एका टॅबमध्ये डाऊनलोड केल्याशिवायही गेम ट्राय केले जातील. हे फिचर १ बिलियन अॅनरॉईड डिव्हाईसेस वर वैश्विक स्तरावर उपलब्ध केले जाणार आहे.
