रिलायन्स जिओ तुम्हाला देत आहे कमाई करण्याची संधी


मुंबई : स्वस्त टॅरिफ प्लान टेलिकॉम मार्केटमध्ये लाँच करणारी कंपनी रिलायन्स जिओ तुम्हाला कमाई करण्याची संधी देत असून तुम्ही यातून महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता.

नेटवर्क मजबूत करण्यासाठी रिलायन्स जिओ एक लाख नवे टॉवर उभारणार आहे. टेलिकॉम कंपन्या कॉल ड्रॉपच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी ७४ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. एअरटेल यातील १६ हजार कोटी रुपये आणि जिओ ५० हजार कोटी रुपये गुंतवणार आहे.

येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात जिओ एक एप्रिल २०१८मध्ये देशात एक लाख टॉवर लावणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी टॉवर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. गेल्या वर्षी कंपनीकडून नव्या वर्षात टॉवर लावण्याची घोषणा केली होती. तुमच्याकडे टेरेस वा जमीन आहे तर तुम्ही मोबाईल टॉवरसाठी अर्ज करु शकता. कंपनीकडून तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपयांची कमाई करु शकता.

तुम्हाला जर टॉवर टेरेस वा एखाद्या मोकळ्या जागेवर बसवायचा आहे तर कंपनीच्या नियमानुसार तितकी जागा आहे की नाही हे तपासून घ्या. टेरेसवर टॉवर लावण्यासाठी कमीत कमी ५०० स्क्वे फूट जागा असणे गरजेचे आहे. अथवा तुमच्याकडे प्लॉट असल्याचा त्याचा एरिया कमीतकमी २००० स्क्वे फूट असला पाहिजे. जर तुम्ही जिओच्या टॉवरसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जमिनीच्या पेपरची फोटोकॉपी, एनओसीचे पेपर, लँड सर्व्हे रिपोर्ट आणि आयडीप्रूफ असणे गरजेचे आहे.

Leave a Comment