५० लाख तरुणांना नोकरीसाठी तयार करणार व्होडाफोन


नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या ‘आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा’ची घोषणा व्होडाफोनने केली असून २०२२ पर्यंत या कार्यक्रमात व्होडाफोनतर्फे भारतात ५० लाख आणि १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या जगातील नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार केले जाणार आहे. एक नवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म भविष्य नोकरी शोधण्यासाठी व्होडाफोनने सुरू केला असल्यामुळे वर्तमान डिजिटल अर्थव्यवस्थेतेत करिअर करण्यास तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. नोकरी शोधण्यासही यामुळे मदत होणार आहे.

फ्यूचर जॉब फाइंडर अंतर्गत, जलद साइकोमीट्रिक टेस्टची एक श्रृंखला सुरु करण्यात आली आहे. युवक या माध्यमातून त्यांच्या पात्रतेनुसर आवडीच्या क्षेत्रात ओळख बनवू शकणार आहेत. या प्लॅटफॉर्मद्वारे युजर्स संबंधित ऑनलाइन डिजिटल कौशल्य प्रशिक्षण शोधू शकतात.

देशातील सर्वात तरुणांची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत ओळखला जातो. सरकारच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत, डिजिटल कौशल्यांना ज्यासाठी बढती पाहिजे. वेळोवेळी, प्रत्येक कामाची जागा डिजिटल होत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मागणी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वाढत असल्याचे यावेळी व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद यांनी सांगितले.

Leave a Comment