
मुंबई : आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची मुदत रिलायन्स जिओने वाढवली असून या ऑफरची शेवटची तारिख १५ मार्चला होती. आता ती वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. तुम्ही या ऑफरचा जर अजूनही लाभ घेतला नसेल तर तुमच्याकडे १५ दिवसांचा वेळ आहे.

३९८ रुपये किंवा त्याच्याहुन अधिक किंमतीचा रिचार्ज जिओच्या १००% कॅशबॅक ऑफरअंतर्गत प्राईम युजर्सला करावा लागेल. त्यावर तुम्हाला ४०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ मिळाल्यावर ४०० रुपये तुम्हाला ८ कूपनच्या स्वरुपात मिळतील. १ कूपन ५० रुपयांचे असेल. एका वेळेस एकच कूपन वापरता येईल. म्हणजे एका रिचार्जवर ५० रुपयांची सुट मिळेल. जर तुम्ही पेटीएमने रिचार्ज करत असाल आणि नवीन युजर असाल तर तुम्हाला ५० रुपये कॅशबॅक मिळेल. तर आधीपासूनच्या युजर्संना ३० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. यासाठी नव्या युजर्संना न्यू जिओ प्रोमो कोड आणि आधीपासूनच्या युजर्संना पेटीएम जिओ प्रोमो कोड वापरावा लागेल.जात तुम्ही भीम अॅपमधून रिचार्ज करत असाल तर नवीन युजर्संना १०० रुपयांचे तर जुन्या युजर्संना ३० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.मोबिक्विकवरुन रिचार्ज केल्यास दोन्ही युजर्संना ३०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझॉन पे वरुन रिचार्ज केल्यास दोन्ही युजर्संना ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.
