९ लाखांनी महाग होणार ऑडी


नवी दिल्ली – ९ लाख रुपयांपर्यंत कारच्या किमती वाढविणार असल्याचे ऑडी या जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनीने सांगितले असून सरकारने अर्थसंकल्पात आयात करण्यात येणा-या कारवरील शुल्कात वाढ करण्यात आल्याने १ एप्रिलपासून या कार महागणार आहेत. कंपनीच्या सर्व मॉडेलच्या किमती ५ टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्यामुळे किमान १ लाख रुपये ते ९ लाख रुपयांपर्यंत कार महागणार असल्याचे ऑडी इंडियाने म्हटले.

ऑडीकडून सादर करण्यात आलेल्या एसयूव्ही प्रकारातील क्यू ३ किंमत ३५.३५ लाख रुपये ते स्पोर्ट्स प्रकारातील आर८ची किंमत २.६३ कोटी रुपये आहे. आयात शुल्क आणि सामाजिक कल्याण अधिभार आकारण्यात येणार असल्याने आयात करणा-या कारच्या किमती वाढणार आहेत. जास्तीत जास्त भार ग्राहकांवर पडणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले. सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्क १० वरून १५ टक्क्यांवर नेण्याची तरतूद केली होती.

Leave a Comment