जिओफायसोबत मिळणार ८ महिने फ्री ४जी डेटा


मुंबई : पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर रिलायन्स जिओने सादर केली असून युजर्संना या ऑफरमध्ये ८ महिन्यांपर्यंत दररोज १.५जीबी डेटा फ्री मिळेल. फक्त जिओफायच्या युजर्ससाठी ही ऑफर आहे. १९९९ रुपयांना खरेदी केलेल्या जिओफायमध्ये आता ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. त्याचबरोबर १२९५ रुपयांचा डेटा मिळेल. याअंतर्गत युजर्स १.५ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी डेटा असलेले प्लॅन्स वापरू शकता.

१९९९ रुपयांच्या जिओफायमध्ये रिलायन्स जिओ मोफत डेटा आणि जिओ व्हाऊचर देईल. ग्राहकांना या ऑफरमध्ये एकूण ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. कंपनी ९९९ रुपयांचा या ऑफरमध्ये जिओफाय १९९९ रुपयांना देईल. ज्यात १२९५ रुपयांचा बंडल्ड डेटा आणि २३०० रुपयांचे जिओ व्हाऊचर मिळेल.

जिओफाय खरेदी केल्यावर २३०० रुपये किंमतीचे जिओ व्हाऊचर्स मिळतील. तुम्ही या व्हाऊचर्सचा वापर पेटीएम, AJio आणि रिलायन्स डिजिटलमध्ये करू शकता. तसेच या ऑफरचा फायदा रिलायन्स रिटेल स्टोरवर घेता येईल. जिओच्या वेबसाईटवरही हा फायदा मिळेल. या सर्व ऑफर्ससोबत युजर्स प्राईम मेंबरशिप घेऊ शकतात.

Leave a Comment