जेफ बेझोस बनले जगातील सगळ्यात श्रीमंत गृहस्थ


फोर्ब्जने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून ११० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे जगातील सगळ्यात श्रीमंत गृहस्थ ठरले आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत १९व्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य ४०.१ अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर्सची आहे. ८४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट असून बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या (७२ अब्ज डॉलर्स) व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या (७१ अब्ज डॉलर्स) स्थानावर आहेत.

३.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही फोर्ब्जच्या यादीत आहेत. ६.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असलेले पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण हे ही फोर्ब्जच्या यादीत आहेत.

Leave a Comment