भारतात दाखल झाले सॅमसंगचे नवे स्मार्टफोन


नवी दिल्ली – गॅलक्सी एस ९ आणि गॅलक्सी एस ९ प्लस हे अत्याधुनिक स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात दाखल केले आहेत. मोबाईल वर्ल्ड काँगेसमध्ये १० दिवसांपूर्वीच हे प्रिमियम स्मार्टफोन पहिल्यांदाच सादर करण्यात आले होते.

अत्याधुनिक प्रोसेसर, सर्वोत्तम कॅमेरा, एकेजी डय़ुअल टय़ुन स्पीकर्स, एआर एमोजी यासारख्या वैशिष्टय़ांचा या स्मार्टफोनमध्ये समावेश आहे. सॅमसंगच्या एक्सिनॉस ९८१० प्रोसेसरचा या दोन्ही स्मार्टफोनमध्ये वापर करण्यात आला आहे. आयपी ६८ वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स असणा-या या फोनमध्ये गिबबिट एलटीई, डय़ुअल बॅन्ड वायफाय, यूएसबी टाईप सी, ब्लूटूथ ५.०, ३.५ एमएम हेडफोन जॅकचा वापर करण्यात आला आहे. ४०० जीबीपर्यंत अतिरिक्त मेमरी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज वाढविण्याची क्षमता आहे.

हे दोन्ही स्मार्टफोन लियाक पर्पल, कोरल ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक रंगात उपलब्ध होणार आहे. हे स्मार्टफोन १६ मार्चपासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंग शॉपमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. गॅलक्सी एस ९ स्मार्टफोनच्या ६४ जीबी मॉडेलची किंमत ५७९०० रुपयांपासून सुरू होत, २५६ जीबीसाठी ६५९०० रुपये आहे. गॅलक्सी एस ९ प्लस स्मार्टफोनची ६७ जीबी मॉडेलमध्ये किंमत ६४९०० रुपये असून २५६ जीबी मॉडेलची किंमत ७२९०० रुपये आहे.

Leave a Comment