
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओमुळे जबरदस्त स्पर्धा सुरू झाली असून अन्य कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी स्वस्त दरात नवनवे प्लॅन्स सादर करत आहे. एअरटेल आणि बीएसएनएलचे काही स्वस्त प्लॅन्स गेल्या काही दिवसात बाजारात आले. व्होडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आता दोन नवीन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. पहिला प्लॅन १५८ रुपयांचा असून या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगव्यतिरिक्त २८ जीबी ४जी/३जी डेटा मिळेल.
१५१ रुपयांत व्होडाफोन देणार ‘या’ सुविधा
युजर अनलिमिटेड कॉलिंगच्या अंतर्गत प्रत्येक दिवशी २५० मिनिटांची व्हाईस कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याचबरोबर युजर १ आठवड्यात १००० मिनिटांहून अधिक व्हाईस कॉलिंग करू शकणार नाही. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळेल. दुसरा प्लॅन १५१ रुपयांचा आहे. यात युजर्सला २८ दिवसात अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच १ जीबी ४जी/३जी डेटा मिळेल. तुम्ही या प्लॅनमध्ये दर दिवसाला १ जीबी हुन अधिक डेटा वापरू शकणार नाही.
हे दोन्हीही प्लॅन्स व्होडाफोनने फक्त केरळ सर्कलमध्ये लागू केले आहेत. व्होडाफोनने हा प्लॅन दिल्ली आणि मुंबईत लागू केलेला नाही. या भागात व्होडाफोनचा १९८ रुपयांचा प्लॅन आहे. ज्याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. यात प्रत्येक दिवशी युजरला १.४ जीबी ४जी/३जी डेटा मिळेल. याशिवाय युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दरदिवसाला १०० एसएमएस देखील मिळतील.
