येत्या काळात मराठीतही बनविता येणार ईमेल आयडी


कायम नवनवीन बाबतीत मायक्रोसॉफ्ट ही टेक्नॉलॉजी कंपनी प्रगती करत आघाडीवर असते. मायक्रॉसॉफ्टने आता १५ भारतीय भाषांची ई-मेल आयडीसाठी निवड केली असून मराठी भाषेचाही त्यामध्ये समावेश असून त्यामुळे येत्या काळात तुमचा मेलआयडी निर्माण करायचा असेल तर मराठीसारख्या स्थानिक भाषेचाही वापर करता येणार आहे. आतापर्यंत केवळ इंग्रजीमध्ये आपण मेलआयडी निर्माण करु शकत होतो. पण आता भारतीयांना मायक्रोसॉफ्टने उचललेल्या सकारात्मक पाऊलामुळे आपल्या स्थानिक भाषेत मेल आयडी तयार करता येणार आहेत.

युजर्सना ऑफीस ३६५, आऊटलूक २०१६, आऊटलूक डॉट कॉम, एक्सचेंज ऑनलाइन, एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारखी अॅप्लिकेशनवर ही सुविधा वापरता येणार आहे. ही सुविधा आऊटलूक वापरणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरेल. मायक्रोसॉफ्टने ही घोषणा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने केली असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अँड्रॉईड आणि अॅपलच्या आऊटलूक अॅप्लिकेशनमध्ये युजर्सना भारतीयांना आपल्या मातृभाषेतील मेल पाठवता आणि स्विकारता येणार आहे.

Leave a Comment