पीएनबीचे सदिच्छा दूत पद सोडणार विराट कोहली?


मुंबई : सध्या देशातील दुसरी सगळ्यात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक चर्चेमध्ये असून बँकेमध्ये झालेल्या ११,६०० कोटींपेक्षा जास्तच्या घोटाळ्यामुळे जोरदार टीका होत आहे. या घोटाळ्याचा मास्टर माईंड हिरा व्यापारी नीरव मोदी फरार असून नीरव मोदीची कार्यालये आणि दुकानांवर सीबीआय आणि ईडीकडून छापेमारी सुरु आहे.

सामान्य नागरिक बँकेमध्ये झालेल्या या घोटाळ्यामुळे चिंतेमध्ये असून ठेवीदारांना बँकेमध्ये ठेवलेल्या पैशांचे काय होणार असा सवाल पडला आहे. यामध्येच आता पंजाब नॅशनल बँकेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर विराट कोहली त्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पद सोडू शकतो, अशी माहिती आहे. याबाबत अद्याप विराट कोहली किंवा बँकेककडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. कोणत्याही ब्रॅण्डवर आरोप झाले तर याचा फटका सेलिब्रिटीलाही बसतो. त्यामुळे अशा वादांपासून लांब राहण्याचा प्रयत्न सेलिब्रिटी करतात. विराट कोहली २०१६ सालपासून पंजाब नॅशनल बँकेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

Leave a Comment