
नवी दिल्ली : गुंतवणूकीच्या दुनियेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांनी नुकताच बिटकॉईनच्या संदर्भात एक खुलासा केला. जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध रहा कारण हे एक मायाजाल असून हा फुगा केव्हाही फूटू शकतो, असा इशारा बफे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
वॉरेन बफे म्हणतात; बीटकॉईन हे एक मायाजाल
बफे यांच्या मते, अधिक काळ ही क्रिप्टोकरंसी टिकू शकणार नाही. या प्रकारात आपण स्वत:देखील गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूकदारांचे यात मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या बाबतीत भारत सरकारनेसुद्धा सूचना देत धोक्याची घंटा वाजवली आहे.
एकीकडे क्रिप्टोकरंसी यशस्वी होत असताना जगभरात मात्र याविषयी धोक्याची घंटा वाजवण्यात येते आहे. भारतासकट अनेक देशांत याला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाने बिटकॉईनवर बंदी घातलेली आहे.
