रोबोट्सचा आगामी बारा वर्षांत ८० कोटी नोकऱ्यांवर डल्ला


नोकरीच्या संधींसाठी आतापर्यंत माणसांमध्येच स्पर्धा होती, मात्र आता माणसांना रोबोटशीही मुकाबला करावा लागणार आहे. वर्ष 2030 पर्यंत यंत्रमानव बारा वर्षांत 80 कोटी नोकऱ्या पळवणार आहेत, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) अहवालात म्हटले आहे.

येत्या काळात रोजगार क्षेत्रात मोठी उलथापालथ होणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी या नावाने चौथी औद्योगिक क्रांती होणार असल्याचे हा अहवाल सांगतो. फ्यूचर ऑफ जॉब्स असे या अहवालाचे नाव आहे.

पुढच्या पाच वर्षांत जगात 50 लाखांपेक्षा जास्त रोजगार केवळ रोबोट्सच्या हातात, अशी शक्यता त्यात वर्तविण्यात आली आहे. यासाठी 800 पेक्षा अधिक क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. यात उत्पादन, निर्मिती तसेच कार्यालयीन कामही रोबोट्स करतील, असे त्यात म्हटले आहे.

याच बरोबर काही नोकऱ्या अगोदरच यंत्रमानव व ड्रोननी हिरावल्याचे बीबीसीने म्हटले आहे. या वृत्तानुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2017 पर्यंत 89 हजार अमेरिकी नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. येत्या 10 वर्षांत 17 टक्के अमेरिकी नोकऱ्या ड्रोन आणि रोबोट हेच मिळवतील, असे या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Comment