
नवी दिल्ली : रिलायन्स जिओशी दूरसंचार कंपन्यांची स्पर्धा सुरुच असून आता ७९९चा रिव्हाईज प्लॅन एअरटेलने आणला आहे, ग्राहकांना ज्यामध्ये दिवसाला ३.५GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. २८ दिवसांची या प्लॅनची व्हॅलिडिटी असेल.
जिओवरही भारी पडणार एअरटेलचा हा प्लॅन
एअरटेलचा हा रिव्हाईज प्लॅन असून याच प्लॅनमध्ये यापूर्वी दिवसाला ३जीबी डेटा मिळत होता. पण ही मर्यादा आता ३.५जीबी करण्यात आली आहे. केवळ आयफोनसाठी जिओचा ७९९चा प्लॅन होता. पण एअरटेल आता याच प्लॅनमध्ये प्रीपेड ग्राहकांना २८ दिवसांसाठी ९८जीबी डेटा देणार आहे.
दरम्यान, तुम्हाला एअरटेलच्या या प्लॅनमध्ये फोनवर बोलण्यासाठी मर्यादा आहे. दिवसाला २५० आणि आठवड्याला १ हजार मिनिट वापरता येतील. लोकल आणि एसटीडी कॉलसाठी ही मर्यादा लागू असेल. एअरटेल पेमेंट बँक वॉलेटमधून रिचार्ज केल्यास ग्राहकांना ७५ रुपये कॅशबॅकही देण्यात येत आहे.
