स्टेट बँकेच्या गृहकर्जाचा ईएमआय ३८४ रुपयांनी स्वस्त!


मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून बेस रेट ८.९५%वरून ८.६५% केला असून इतर सर्व बँकांपेक्षा हा दर कमी असल्यामुळे २० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ईएमआय सुमारे ३८४ रुपयांनी कमी होणार आहे.

एमसीएलआर पद्धत एप्रिल २०१६ पासून सुरू होण्याआधी कर्जांवरील व्याज हे बेस रेटनेच ठरवले जात होते. बँकांच्या निधी उभारणीशी निगडित एमसीएलआरमध्ये बदल करण्यात आलेला नाही. एका वर्षाचा एमसीएलआर ७.९५% आहे. म्हणजे एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय कमी होणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने याआधी २८ सप्टेंबरला बेस रेट ०.०५% घटवला होता. बँकांनी व्याजदरात किंचित कपात केल्याने रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदवला होता. रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत रेपोदरात १.७५% कपात केली आहे. तुलनेत बँकांनी बेसरेटमध्ये सरासरी ०.६० टक्केच कपात केली आहे.

Leave a Comment