या ठिकाणी तुम्हाला केवळ ५ लाखांत मिळू शकते आलिशान मर्सडिज


नवी दिल्ली : आता तुम्हाला केवळ ५ लाख रुपयांत आलिशान आणि लक्झरी अशी मर्सडिज कार खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली असून ४५० आलिशान गाड्या दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाने लिलावासाठी काढल्या आहेत. अवैध दारुसोबत या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.

दोन वर्ष जुन्या मर्सडिज कारचा लिलावात काढलेल्या या गाड्यांमध्ये समावेश आहे. ही मर्सडिज बेंज (ई-३५०) असून तिची एक्स-शोरुम किंमत ८० लाख रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होणार असून सुरुवाती बोली ५ लाख रुपयांपासून सुरु होत आहे. लिलावात मर्सडिजसोबतच टोयोटा कोरोला, होंडा सीआरव्ही, होंडा सीटी आणि इन्होवा या कार्सचाही समावेश आहे.

कुठलीही व्यक्ती या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊ शकते. ई-कॉमर्स वेबसाईट मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एम.एस.टी.सी.) वर यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. एम.एस.टी.सी हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जे ऑनलाईन लिलाव प्रक्रियेचे आयोजन करते.

Leave a Comment